
नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेतर्फे (पुणे) गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना चंद्रकांत पकये यांना आदर्श सरपंच पुरस्कार १९ जुलै रोजी पुणे येथे वितरण.
रत्नागिरी : पुणे येथील नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेच्या वतीने तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना चंद्रकांत पकये यांची आदर्श सरपंच म्हणून आपली निवड करण्यात आलेली आहे. १९ जुलै रोजी नवी पेठ, पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून, याच सोहळ्यात सरपंच कल्पना पकये यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची आदर्श सरपंच म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. गणपतीपुळे येथे केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत ही संस्थेच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२५ ने सन्मानित केले जाणार आहे.




