पुराच्या पाण्यात दुचाकी घालणाऱ्या महिलेला तरुणांनी वाचवले.

खेड शहरात मंगळवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मटण मार्केट परिसर जलमय झाला. या परिसरातील भोसते रोडमार्गे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला नागरिकाने पुराचे पाणी असूनही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक वाढलेल्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की महिला आणि तिची दुचाकी पुराच्या लाटांमध्ये वाहून जाण्याच्या स्थितीत आली.ही धोकादायक परिस्थिती ओळखून परिसरातील तीन जागरूक तरुणांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाण्यात उडी घेत महिलेचा जीव वाचवला. सरफराज भाऊ पांगारकर, एजाज खेडेकर आणि खालील जुईकर या तिघांनी कोणतीही भीती न बाळगता पुराच्या प्रवाहात उतरून महिलेला बाहेर काढले. या धाडसी कृत्यामुळे मंगळवारी खेड बाजारपेठेत या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button