त्या निष्पाप जीवांना अजून मदतीची गरज आहे…जयभैरव नवरात्र उत्सव व भैरवनाथ पथकाच्या सदस्यांना आला माणुसकीचा अनुभव

रत्नागिरी:कोल्हापूर-सांगली भागात आलेल्या महापुराने अनेकांना उद्ध्वस्त करून टाकले. त्यांची घरे, गुरे, शेतीपासून त्यांचे सर्वस्वच हरपले आहे. रत्नागिरीतल्या मांडवी येथील जयभैरव नवरात्र उत्सव मंडळ व भैरवनाथ ढोलताशा पथकातील सदस्यांनी मांडवी गावातून पुरग्रस्तांसाठी मदत गोळा केली. ही मदत गोळा करून त्यांनी प्रत्यक्ष आपदग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांगलीतील कववाड, कुटवाड, भालवाड आणि शिर्टी गाव गाठले. तेथे आलेला अनुभव एवढा विदारक होता त्याचे वर्णन शब्दातही करता येणार नाही. या मंडळाच्या सदस्यांना आलेला अनुभव आता त्यांच्या शब्दातूनच अनुभवुया…
मांडवी गावातून पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करून आम्ही थेट सांगलीतील कववाड, कुटवाड, भालवाड, आणि शिर्टी गावी पोहोचलो. गा गावातील परिस्थिती अतिशय भयानक होती. गावातील लोकांना साधे पिण्यासाठी पाणीही नव्हते. म्हणजे या लोकांची स्थिती काय भयानक असेल याची कल्पनाच करणे अवघड होते. त्यांच्यावर काय आपत्ती आली असणार याचा विचारही आपण करू शकत नाही. संपूर्ण संसारच उदध्वस्त झाला असून फक्त आता उरले आहेत तेथे भग्न अवशेष आणि जुन्या आठवणी. या भागाला सगळ्यात मोठी गरज आहे ती मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची. अन्यथा तेथे मोठया प्रमाणावर रोगराई पसरू शकते. गावात सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य, येणारी दुर्गंधी, यामुळे आमच्या अनेक स्वयंसेवकांना अक्षरशः उलट्या झाल्या. त्यातूनही मार्ग काढत आम्ही त्या भागात पोहोचलो. मोठया प्रमाणावर संसारोपयी साहित्य, औषधे, पाणी, सर्व प्रकारचे कपडे याचे वाटप घरोघरी व त्यांच्या वाड्यावस्त्यांवर सदस्यांनी केले.
या वस्तू देत असताना आमच्या मदतीने भारावलेल्या त्या लोकांच्या डोळ्यात जमा झालेल्या अश्रुंवरून आम्हाला त्यांच्या भावना कळत होत्या. सोशल मिडियावरून या ठिकाणच्या लोकांना मदतीची गरज नाही असे प्रसिद्ध केले जात होते परंतु प्रत्यक्षात देण्यात येणार्‍या बातम्या व येथील परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक होता. सोशल मिडियावरून या बाबम्यांबाबत सांगलीतील या गावातील लोकांनी संतापही व्यक्त केला. आज परिस्थितीने आम्हाला ही वेळ आणली आहे ही त्यांच्या मनातील भावना ते फक्त बोलून दाखवू शकत नव्हते. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करणार्‍या रत्नागिरीकरांना व त्यावर बातम्या आणि इतर गोष्टी फॉरवर्ड करणार्‍यांनी याची सत्यता पाहणे गरजेचे आहे. आपण स्वतः प्रत्यक्ष जावून पाहणी केल्याशिवाय तेथील भयावह अनुभव व परिस्थिती आपण समजू शकणार नाही. यामुळे अशा मिडियाचा वापर करणार्‍या पत्रकार व अन्य मंडळींना आमची विनंती आहे की त्यांनी चुकीचे वृत्त देवून या मदतीची गरज असलेल्या निष्पाप जीवांना मदतीपासून वंचित करू नका.
या गावात जावून आम्ही घालवलेले ३२ तास आमच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहेत. आम्हा चिमुरड्या लहानग्यांना मदतीचं बळ देणार्‍या सर्व व्यक्तींचे आम्ही ऋणी आहोत. आम्हाला एकच समाधान आहे की आपण दिलेली मदत आम्ही योग्य हातापर्यंत पोहोचवली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button