
महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) समिती स्थापन करण्यात येणार.
सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. यात जिल्ह्यात विविध प्रकल्प कोणत्याही अडचणीशिवाय सुरू करता यावेत, यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. पालघर येथील वाढवण बंदर झाल्यावर सिंधुदुर्गातील बेरोजगार तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य, वीज, सार्वजनिक बांधकामसह अन्य विभागाचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यावर माझा भर असल्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे सांगितले.www.konkantoday.com