
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सरकारमान्य देशी दारु पिणार्यांचे प्रमाण 40 टक्यांपर्यंत घसरले.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सरकारमान्य देशी दारु पिणार्यांचे प्रमाण 40 टक्यांपर्यंत घसरले आहे. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 – 19 साली देशी दारुची 24 लाख 44 हजार 658 बल्क लिटर विक्री झाली होती.हीच विक्री 2023-24 च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत 12 लाख 59 हजार 982 बल्क लिटर पर्यंत आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देशी दारु परवाना धारकांची मात्र यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.देशी दारु दुकानांच्या परवाना नूतनीकरणाचे शुल्क 10 टक्याने वाढविण्यात आले आहे. देशी दारु विक्रीचा परवाना मिळविण्यासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. अशा वेळी देशी दारु विक्रेत्यांच्या दारुची अपेक्षित विक्री न झाल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील देशी दारु दुकानदार फारच अडचणीत आले आहेत. दारु विक्री घटल्यानंतर शासनाचा महसुलही कमी होतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) हातभट्टी दारु विक्री करणार्यांसह गोवा बनावटीच्या दारुची चोरटी विक्री करणार्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या चोरट्या धंद्यामुळेच देशी दारु विक्रीवर परिणाम झाला असल्याचा देशी मद्य विक्रेता संघाचा संशय आहे.