दोडामार्ग कसईनाथ डोंगरावरील भलेमोठे दगड कोसळले!

सावंतवाडी :* दोडामार्ग येथील प्रसिद्ध कसईनाथ डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी हजारो भाविक जातात. रविवारी सायंकाळी (७ जुलै रोजी) या डोंगराचा काही भाग कोसळल्याचा मोठा आवाज आला. ही घटना दोडामार्ग येथील कसर्ईनाथ डोंगरावर, वाघाचे बिळ असलेल्या भागात घडली, अशी माहिती गिरोडा गावातील ग्रामस्थांनी दिली आहे.*

*गिरोडा गावातील काही ग्रामस्थ रविवारी सायंकाळी आपल्या गुरांना घेऊन शेतात चरण्यासाठी गेले होते. सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना कसईनाथ डोंगरातून मोठा आवाज ऐकू आला.

हा आवाज ऐकून जनावरे चरण्याचे सोडून पळू लागली, तर मोर आणि माकडे मोठ्याने आरडाओरडा करू लागली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाचे बिळ येथील वडाच्या शेळीसमोर कसईनाथ डोंगरातील खडकातील दगड आणि झाडे खाली कोसळल्याचे निदर्शनास आले.

*या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दोडामार्ग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, ज्यात विश्राम कुबल यांचा समावेश होता, गिरोडा गावाला भेट दिली आणि कसईनाथ डोंगराच्या पायथ्याशी पाहणी केली. सुरुवातीला काही वन कर्मचाऱ्यांना घटनेबद्दल खात्री नव्हती, कारण काही ग्रामस्थांना याची माहिती नव्हती. मात्र, वाघाचे बिळ येथे खडकातील दगड आणि झाडे खाली कोसळल्याचे ग्रामस्थांनी दाखवलेल्या शेतातून दिसून आले, ज्यामुळे ग्रामस्थांची माहिती खरी ठरली.*

वन कर्मचाऱ्यांनी वाघाचे बिळ असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याचे सांगितले. कारण तो भाग घनदाट जंगल आणि बिबट्या तसेच वाघाच्या वास्तव्यामुळे अत्यंत धोकादायक आहे. कोसळलेले दगड आणि झाडे मोठ्या प्रमाणात खाली आले असून, त्यामुळे मोठा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कसर्ईनाथ डोंगर हे महादेव सिद्धनाथ स्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मोठी झाडे आणि खडकाळ भाग आहे, विशेषतः गिरोडा गावाच्या दिशेने. या घटनेमुळे त्या भागातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button