
नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान, चित्र स्पष्ट झाल्यानंतर युतीसंदर्भात बघू,राज ठाकरे यांचा सावध पवित्रा
हिंदी भाषा सक्तीविरोधात मिळवलेल्या विजयी मेळाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये युतीचे वारे वाहत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.उद्धव ठाकरे यांनी औपचारीक गप्पांमध्ये युतीबाबत सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान, चित्र स्पष्ट झाल्यानंतर युतीसंदर्भात बघू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.
विधान भवनाच्या आवारात उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे – शिवसेना युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मनसेशी युतीबाबात सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युतीबाबत टप्पा टप्प्यानं प्रक्रिया सुरू आहे, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. ‘मेळाव्यानंतर ठाकरे एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. इथून पुढेही होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल’, असं उद्धव ठाकरेंनी अनौचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे.