
महामार्गप्रश्नी लवकरच गडकरींबरोबर बैठक, आमदार शेखर निकम यांची ग्वाही.
रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गप्रश्नी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे. ती लवकरच होईल. त्यामुळे तुमच्या अडचणी, प्रश्न मला सांगा आणि त्या बैठकीला तुम्हीही या, मी तुम्हाला बोलावतो, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी रविवारी मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.गेल्या अनेक वर्षापासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. हा प्रश्न काही दिवसांपासून आमदार निकम यांनी अधिवेशनात उपस्थित करीत त्याचा वाहनचालकांना किती त्रास होतो, त्याची वस्तुस्थिती मांडली. त्यामुळे रविवारी मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.यावेळी सेनेच्या जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी निकम यांना तुम्ही महामार्गावर कधी पाहणी करण्याचा शो केला नाहीत, जे करता ते प्रामाणिक आणि निःस्वार्थीपणे राजकीय वस्त्र बाजूला ठेवून, त्यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे. आमच्या वाहनधारकांच्या व्यथा आणि संपूर्ण महामार्गाचे ब्लॅक स्पॉट असल्याचे ठामपणे सांगणारे तुम्ही एकमेव आहात. त्यामुळे महामार्गासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आमदार निकम यांनी महामार्गाची वस्तुस्थिती गडकरी यांना समजावी म्हणून बैठकीची मागणी केली. या बैठकीला तुम्ही आलात तर गडकरी यांना अधिक माहिती समजेल आण त्यातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करताना येथे राजकारण विषय नाही, मी आमदार म्हणून नव्हे तर चिपळूण-संगमेश्वरचा सेवक म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी संजय वाजे, रवी दिघे, सुरेश घाग आदी उपस्थित होते.www.konkantoday.com




