
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोड्या व मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य सराईत आरोपीच्या मुसक्या सिंधुदुर्ग पोलिसांनी आवळल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोड्या व मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य सराईत आरोपीच्या मुसक्या सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. या आरोपींना कर्नाटक बेंगलोर येथे अटक करण्यात आले असून आरोपींची नावे शंकर मधुकर पवार उर्फ हाड्या, आणि राजू मधुकर पवार उर्फ गुंड्या (रा. मोहोळ, सोलापूर) अशी आहेत. आरोपींनी जुलै महिन्यात सावंतवाडी येथील घरफोडी करण्याचा प्रयत्न केला होता तसेच लक्ष्मीनगर येथे दोन मोटरसायकलची चोरी केली होती. या आरोपींनी विविध जिल्ह्यात ३० ते ३५ गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.www.konkantoday.com



