
महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूख येथील टायटन जीनच्या रोहन भालेकर याची चमकदार कामगिरी.
महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूख येथील टायटन जीनच्या रोहन भालेकर याने चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. ठाणे नौपाडा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रोहन भालेकर याने जीन्स मॉडेल स्पर्धेतील दुसर्या गटात तिसरा क्रमांक तर शरीर सौष्ठव स्पर्धेतील सातव्या गटात सहावा क्रमांक मिळवला. याबाबत टायटन जीमचे सागर संसारे, नसीर फुलारी, प्रशिक्षक नंदकिशोर साळवी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.www.konkantoday.com




