
फुणगूस गावाजवळ कार कोसळली, सुदैवाने कोणीही जखमी नाही.
फुणगूस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गणपतीपुळे येथे मुंबईच्या दिशेने जाणारी बोलेरो कार बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली. ही घटना काल दुपारी घडली. अपघात घडताच स्थानिक तरूण साईम खान, जिंतेंद्र थुळ, कामील मुल्ला, सुरज लांजेकर, जमीर नाईक, गजानन भोसले, सर्फराज खान, प्रकाश भोसले आदींनी घटनास्थळी धाव घेवून मोठ्या प्रयत्नानंतर अपघात घडलेल्या गाडीतील लोकांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.www.konkantoday.com