
खेड तालुक्यातील घेरापालगड येथे तरूणाची गळफास लावून आत्महत्या.
खेड तालुक्यातील घेरापालगड गावात मुंबईहून आलेल्या तुषार शिंदे या (वय २१) तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. तुषार शिंदे हा ठाणे येथे रहात होता. ठाण्याहून कोणालाही न सांगता तो घेरापालगड येथील आपल्या मुळ घरी आला व तेथेच त्याने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलच्या दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळलेले नाही.www.konkantoday.com