
रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या ठिकाणाहून कार चोरीला.
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे दुकानासमोर लावलेली कार चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ९ जुलै रात्री १०च्या सुमारास घडली. बशीर मुसा काझी (५८, रा. एमआयडीसी झाडगाव, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कार चोरी करणार्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. बशीर काझी हे आपली कार (एमएच-०८ एजी २१६६) घेऊन साळवी स्टॉप येथे घरगुती कमामासाठी निघाले होते. मेडिकलमध्ये औषधे घ्यायची असल्याने ते मिल्लतनगरमार्गे आरोग्य मंदिर येथे आले. आरोग्य मंदिर येथे चावी गाडीला ठेवून रस्त्याच्या पलिकडील बाजूला असलेल्या मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गेले. तेथे औषधे खरेदी करुन झाल्यानंतर आरोग्य मंदिर येथे गाडीजवळ आले असता त्यांना गाडी दिसली नाही. या प्रकरणी काझी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com