
मिर्या किनार्यावर गेली पाच वर्षे अडकून पडलेले ३५ कोटी रुपये किंमतीचे ’बसरा स्टार’ हे जहाज अखेर भंगारात.
रत्नागिरी येथील मिर्या किनार्यावर गेली पाच वर्षे अडकून पडलेले ३५ कोटी रुपये किंमतीचे ’बसरा स्टार’ हे जहाज अखेर भंगारात काढण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर २ कोटी रुपयांना हे जहाज विकत घेतलेल्या भंगार विक्रेत्याने गुरुवारपासून जहाजाचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे. क्रेनच्या मदतीने जहाजाचे काही भाग तोडून जमिनीवर घेतले जात आहेत. पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन सुरक्षितपणे जहाज तोडण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सेल्फी पॉईंट ठरलेले हे जहाज आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. मिर्या किनार्यावर यापुढे त्याची फक्त आठवण उरणार आहे.२०२० साली आलेल्या वादळात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बसरा स्टार हे जहाज लाटांच्या मार्यामुळे मिर्या किनार्यावर येवून धडकले होते. गुजरातहून केरळच्या दिशेने ते जात होते. त्यावेळी ते जहाज लाटांच्या मार्यामुळे मिर्याच्या दिशेने ते जात होते. त्यावेळी एनडीआरएफच्या मदतीने जहाजावरील कॅप्टन आणि खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले होते. हे जहाज किनार्यावर उभे होते. या काळात त्याची डागडुजी न झाल्याने ते पूणंपणे गंजले होते आणि त्याचा काही भाग वाळूत रूतला होता. अखेर हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.www.konkantoday.com