
राजापूर तालुक्यातील प्रिंदावन मानवाडी सड्यावरती रानगवा मृतावस्थेत सापडला
राजापूर तालुक्यातील प्रिंदावन मानवाडी सड्यावरती रानगवा मृतावस्थेत आढळून आला आहे. पशुधन अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तरीय तपासणीनंतर गव्याचा नैसर्गिक मृत्यु झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून वनविभागाकडून मृत गव्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्रिंदावन येथील मानवाडी साड्यावर वन्यप्राणी रानगवा मृत अवस्थेत असल्याचे दिसले.
या रानगव्याची पाहणी केली असता, तो नर जातीचा असून त्याचे वय साधारण ११ ते १२ वर्ष आहे. या रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय याची खात्री पशुधन विकास अधिकारी राजापुर व वन अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली. पशुधन विकास अधिकारी श्री.चोपडे यांचे मार्फत शवविच्छेदन केले. त्यांनी रानगव्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले.