
विनोदी कलाकार आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे रविवारी सकाळी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन
ज्येष्ठ अभिनेते, विनोदी कलाकार आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे रविवारी सकाळी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.त्यांना २०१५ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
१९९९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एकत्रित आंध्र प्रदेशातील विजयवाडा ईस्ट मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ‘कोटा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास राव यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमी कलाकार म्हणून केली होती. कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराजवळील कंकीपाडू या गावात झाला. त्यांनी १९७८ मध्ये प्रणम खरीडू या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मात्र प्रतिकारण या चित्रपटातील कसैय्या या पात्राने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली. तेलुगू चित्रपटसृष्टीत कोटा श्रीनिवास राव आणि दुसरे माजी आमदार बाबू मोहन यांची विनोदी जोडी खूप गाजली होती. कोटा श्रीनिवास राव, भाजप नेते आले नरेंद्र आणि काँग्रेस नेते द्रोणम राजू सत्यनारायण हे तेगिंपु या चित्रपटात झळकले होते, ज्यात भानुचंदर मुख्य भूमिकेत होते.
खलनायक म्हणून साकारल्या संस्मरणीय भूमिका
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट केले की, “आपल्या बहुमुखी भूमिकांनी चित्रपट प्रेक्षकांचे प्रेम जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे.