
मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात अपघात, दोघे गंभीर.
खेड : वार्ताहर मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात ट्रकचा अपघात झाला. ट्रकचा चालक ट्रक मध्ये अडकून पडला होता. काही वेळाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या सोबतच आणखीन एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमी ना मदत ग्रुपचे श्री प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. या कामी श्री प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष सहकार्य केले.