
रत्नागिरी ग्राहक पेठचा रंगणार श्रावण महोत्सव.
स्टॉल बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनरत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठने आपल्या श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्री यांची घोषणा केली आहे. शुक्रवार दि. १ ऑगस्ट ते सोमवार दि. ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे.रत्नागिरी ग्राहक पेठच्या माध्यमातून संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या प्राचीताई शिंदे यांनी आजपर्यंत अनेक महिला उद्योगिनींना मदत केली आहे. महिला बचत गटांनाही त्या नेहमीच सहकार्य करत आहेत. दरवर्षी महिला दिन, दिवाळी सणामध्ये रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे प्रदर्शन भरवण्यात येते.
उदयोन्मुख उद्योगिनींना व्यवसायाची सुवर्णसंधी देणाऱ्या रत्नागिरी ग्राहक पेठेचे काम गेली काही वर्षे सुरू आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्रदर्शनात गणपती बाप्पासाठी पवित्र श्रावण महिन्यातच खरेदी करण्यासाठी या विशेष श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महोत्सवासाठी लवकरात लवकर स्टॉल बुक करण्यासाठी प्राची शिंदे 9422376224, 9764417079 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे करण्यात आले आहे.