
चिपळुणात युवतीची आत्महत्या.
चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बुद्रूक-बौद्धवाडी येथील युवतीने गुरूवारी सकाळी ७.३० वाजता घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आकांक्षा आदेश पवार (१७) असे या युवतीचे नाव आहे.आकांक्षा पवार हिने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. घरातील अन्य खोलीत आजी, आई, लहान बहिण, आते बहिण होती. हा प्रकार सकाळी लक्षात येताच तिची आते बहिण बेशुद्ध पडली. त्यानंतर या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी अन्य अधिकारी, कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह कामथे रूग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यावर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर रात्री उशीरा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आकांक्षा यावर्षी दहावी उत्तीर्ण झाली होती.www.konkantoday.com