
उधना-मंगळूर स्पेशलला मुदतवाढ.
कोकण मार्गावर वसईमार्गे धावणार्या उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दीपावली सुट्टी हंगामासह ख्रिसमस, शिमगोत्सव, दसरा आणि अन्य सणांच्या कालावधीत चालवण्यात येणार्या या द्विसाप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांची मोठी गैरसोय टळणार आहे.www.konkantoday.com