दापोली पोलिसांनी तात्काळ हालचाल करत एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला.
सायबर कक्ष, रत्नागिरी यांच्याकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी तात्काळ हालचाल करत एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला.सायबर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीमध्ये एक व्यक्ती मोबाईलवरून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. सदर व्हिडीओ प्रेमचंद नथ्थू शर्मा या नावाने प्रसारित झाला होता. त्यावरुन दापोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तयार करून शोध मोहिम हाती घेतली.
तपासाअंती प्रेमचंद शर्मा याचा शोध काळकाईकोंड (ता. दापोली) परिसरात लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत समजले की, संबंधित मोबाईल क्रमांक व सिमकार्ड त्याने आपल्या ओळखीच्या आणि पूर्वीच्या सहकाऱ्याला, जंग बहादूर रणवीर सिंग (मूळ रा. मूडवारा, तहसील बगेरू, जि. बांदा, उत्तर प्रदेश, सध्या रा. काळकाईकोंड, दापोली) याला वापरण्यास दिले होते.
यानंतर पोलिसांनी जंग बहादूर याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कबूल केले की आई-वडिलांशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे भावनिक अस्वस्थतेतून त्याने आत्महत्येचा नाटक करत व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ केवळ आई-वडिलांना दाखवण्यासाठी तयार केला होता, मात्र मोबाईल हाताळण्यात असलेला अनुभवाचा अभाव आणि चुकून फेसबुकवर तो व्हिडीओ अपलोड झाल्यामुळे संपूर्ण प्रकार गाजला.
पोलीस ठाण्यात आणून त्याची समजूत घालण्यात आली. त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेत त्याला समुपदेशन करण्यात आले.
दापोली पोलिसांच्या या तत्पर आणिसायबर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीमध्ये एक व्यक्ती मोबाईलवरून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. सदर व्हिडीओ प्रेमचंद नथ्थू शर्मा या नावाने प्रसारित झाला होता. त्यावरुन दापोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तयार करून शोध मोहिम हाती घेतली.
तपासाअंती प्रेमचंद शर्मा याचा शोध काळकाईकोंड (ता. दापोली) परिसरात लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत समजले की, संबंधित मोबाईल क्रमांक व सिमकार्ड त्याने आपल्या ओळखीच्या आणि पूर्वीच्या सहकाऱ्याला, जंग बहादूर रणवीर सिंग (मूळ रा. मूडवारा, तहसील बगेरू, जि. बांदा, उत्तर प्रदेश, सध्या रा. काळकाईकोंड, दापोली) याला वापरण्यास दिले होते.
यानंतर पोलिसांनी जंग बहादूर याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कबूल केले की आई-वडिलांशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे भावनिक अस्वस्थतेतून त्याने आत्महत्येचा नाटक करत व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ केवळ आई-वडिलांना दाखवण्यासाठी तयार केला होता, मात्र मोबाईल हाताळण्यात असलेला अनुभवाचा अभाव आणि चुकून फेसबुकवर तो व्हिडीओ अपलोड झाल्यामुळे संपूर्ण प्रकार गाजला.
पोलीस ठाण्यात आणून त्याची समजूत घालण्यात आली. त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेत त्याला समुपदेशन करण्यात आले. त्याने स्पष्टपणे सांगितले की, आता आत्महत्येचे कोणतेही विचार मनात नाहीत आणि काही अडचण भासल्यास तो पोलिसांची मदत घेईल.
दापोली पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे एक अनाठायी घटना टळली संवेदनशील कारवाईमुळे एक अनाठायी घटना टळली