
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पर्यटन स्थळांसाठी ५ कोटींचा निधी.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनार्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि चेंजिंग रूम्स बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विकास कामांना गती देणे आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजनेचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय कार्यकारिणी समिती, कोकण ग्रामीण पर्यटन विकास, रत्नागिरी यांनी विविध समुद्रकिनार्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट व चेंजिंग रूमसाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.www.konkantoday.com