माचाळच्या निसर्गसौंदर्याला बाधा लागू नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतने पर्यटकांसाठी सूचना फलक.

लांजा तालुक्यातील माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी येणार्‍या मद्यधुंद हुल्लडबाज पर्यटकांकडून येथील निसर्ग सौंदर्याला गालबोट लावण्याचे पालू प्रकार घडू लागल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले असून कचरा टाकण्यासाठी संकलन शेडही तयार करण्यात आली आहे.पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना बेशिस्तपणा केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.या ठिकाणी येणारे पर्यटक धुडगूस घालतात, मद्याच्या बाटल्या फोडून वाटेत टाकतात. खाण्याचे पदार्थ रस्त्यात फेकतात. तसेच मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांकडून आपल्या कुटुंबियांसह येणार्‍या पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असतो. याबाबत लांजा पोलिसांनी तत्काळ दखल देत बेशिस्त पर्यटकावर दंडात्मक कारवाई केली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button