कोळंबे ते शास्त्रीपूल या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे ते शास्त्रीपूल या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे थेट जीव धोक्यात घालण्यासारखे बनले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल, मोठे आणि विखुरलेले खड्डे तयार झाले असून, वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आठवडाभरापूर्वीच ठेकेदाराला खड्डे तातडीने भरून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठेकेदाराने त्यांना जुमानलेले नाही.

परिणामी, रस्त्याची अवस्था जैसे थे राहिली असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बावननदी ते आरवली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर अंतराचा महामार्गाचा भाग एका खासगी ठेकेदाराकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, कामाच्या सुरुवातीपासूनच या ठेकेदाराने अत्यंत संथगतीने काम केले. यामुळे या भागात अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला असून, काही जण कायमचे अपंग झाले आहेत. रस्त्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि ठेकेदाराला एक आठवड्याची मुदत देऊन खड्डेमुक्त रस्ता करण्याचे आदेश दिले. परंतु, आठवडा उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button