
….तोपर्यंत स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत, आ. शेखर निकम यांची विधानसभेत मागणी.
स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने चालू वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र बदललेले मीटर जलद रिडींग दाखवत असल्याने ग्राहक तक्रार घेवून महावितरण कार्यालयात गेल्यानंतर मीटर तपासण्याची कोणतीच सुविधा महावितरण कंपनी आणि ठेकेदार कंपनीकडे नाही. त्यामुळे जोपर्यंत सदोष मीटर तपासणीची व्यवस्था महावितरण कंपनी किंवा ठेकेदार कंपनी करत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात केली.उर्जा विभागावरील चर्चेदरम्यान आमदार निकम यांनी विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.
शहरातील विद्युत वाहिनी पोलवरून दिलेली असल्याने ऊन, वादळ, वारा आणि विशेषतः पुरामुळे या पोलवरील विद्युत वाहिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठा धोका निर्माण होतो. विद्युत पोलवरील तारा तुटून पडल्याने विजेचा झटका बसून माणसे तसेच जनावरांचा नाहक बळी जातो. वीजपुरवठा खंडित होतो. या घटनांनंतर शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अनेकवेळा उशिरा मिळते किंवा काही वेळा मिळत देखील नाही. म्हणूनच चिपळूण शहरातील सर्व विद्युत वाहिन्या तत्काळ भूमिगत करण्यात याव्यात.www.konkantoday.com