
एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न केले चिपळूण मधील डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल.
एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न केले व तिची फसवणूक केली म्हणून मूळच्या चिपळूण मधील एका डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या डॉक्टरचे नाव डॉ. नोमान अत्तारने असे आहे त्याने एका 32 वर्षीय तरुणीला प्रेमळ बोलण्यात फसवून 2023 पासून लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. नंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने तक्रार केली आहे. त्यानुसार, डॉ. अत्तारने लग्नाचे खोटे आश्वासन दिले. शारीरिक संबंध ठेवून गर्भपात करायला लावला आणि नंतर तीची फसवणूक केली.
पोलिसांनी डॉ. नोमान इब्राहिम अत्तार (36) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रियंका आणि डॉ. अत्तार यांची ओळख जुलै 2023 मध्ये एका सोशल मीडिया ॲपवर झाली. त्यावेळी डॉ. अत्तार नवी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आश्वासन देत महापे MIDC मधील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे. त्यानंतर डोंबिवली आणि तळोजा येथेही संबंध ठेवले.डिसेंबर 2024 मध्ये डॉ. अत्तारने चिपळूणमध्ये स्वतःची ओपीडी सुरू केली. महिलेने सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये त्याला मदतही केली. पण प्रेम संबंधात फक्त शारीरिक गरज भागवण्याचा हेतू होता, असा आरोप महिलेने केला आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये ती गर्भवती राहिली. लग्नाचा विषय काढताच, डॉ. अत्तारने वेळ मागितला आणि औषध देऊन गर्भपात करायला लावला. मानसिक तणावामुळे महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 रोजी दोघांमध्ये शेवटचे शारीरिक संबंध झाले. 4 एप्रिलला चिपळूणमधील हेल्थ कॅम्पमध्ये डॉ. अत्तार एका मुस्लिम महिलेसोबत दिसले. त्यांनी तिच्याशी लग्न केल्याचे उघड झाले.पीडित युवती दुबईमध्ये असताना ही माहिती मिळवली. फसवणूक झाल्याचे समजल्यावर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी IPC 2023 च्या कलम 69 (फसवणूक) आणि 89 (शारीरिक शोषण) अंतर्गत 17 जून 2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे. रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल सत्यवान गरड प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.