
टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, भारताच्या लेकींनी इंग्लंडचा घरच्याच मैदानावर केला दारूण पराभव!
:* भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. भारतच्या पुरुष क्रिकेट संघानंतर आता टीम इंडियाच्या महिला संघाने या विजयासह इतिहास घडवला आहे. पुरुष संघाने ५८ वर्षांनंतर बर्मिंगहममध्ये कसोटी जिंकत भारताच्या पराभवांचा दुष्काळ संपवला. तर आता महिला संघाने इंग्लंडविरुद्ध १९ वर्षांनी त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिका जिंकली आहे.भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने ३-१ च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडला चौथ्या टी-२० सामन्यात ६ विकेट्सने पराभूत करत मालिका आपल्या नावे केली. भारताने २००६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर टी-२० मालिका जिंकली आहे. याशिवाय टीम इंडियाने पहिल्यांदाच इंग्लंडला २ किंवा त्याच्यापेक्षा जास्त सामन्यांच्या टी-२० मालिकेत हरवलं आहे.टीम इंडियाने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव करत मालिके त अजेय आघाडी मिळवली आहे.
दोन्ही संघांमधील एक टी-२० सामना अद्याप शिल्लक असला तरी टीम इंडियाने ३-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. याशिवाय भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.दीप्ती शर्मा T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने १२८ सामन्यांमध्ये १४५ विकेट्स घेतल्या आहेत. तिने पाकिस्तानच्या निदा दारला मागे टाकलं आहे. निदा दारने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत ऑस्ट्रेलियाची मेगन शट अव्वल स्थानी आहे. जिने सर्वाधिक १५१ विकेट्स घेतले आहेत.