
गुहागर नगोत्थान योजनेतून ६ लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेली गणपती विसर्जन पाखाडी पुर्णता उध्दवस्त
गुहागर शहरातील वरचापाट स्मशान भूमी ते खाडीच्या मुखापर्यंत असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरील २० वर्षापुर्वीची सुरु लागवड व नगरपंचायत गुहागर नगोत्थान योजनेतून ६ लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेली गणपती विसर्जन पाखाडी पुर्णता उध्दवस्त झाली असल्याचे विदाकर चित्र समुद्रकिनारी निर्माण झाले आहे. यामुळे वरचापाट येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या जेटीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बॅक वॉटरवॉल मुळे समुद्राच्या लाटेचा प्रवाह बदलला असून याचा मोठा फटका हा आता गुहागरच्या समुद्रकिनारी जाणवू लागला आहे. त्यातच होणारा छुपा वाळु उपसाही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गुहागर समुद्रकिनारी असलेल्या सुरुबनाला या लाटांनी २० वर्षापुर्वीपासूनची असलेली लागवड गिळंकृत करून टाकली असून समुद्र लाटांचे पाणी आता माडांच्या बागांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.