शासनाचे सहकार पुरस्कार सन २०२३-२४ साठी नामांकन पाठविण्याचे आवाहन


मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परिपत्रकीय सुचनांनुसार शासनाचे सहकार पुरस्कार सन २०२३ – २४ साठी पात्र सहकारी संस्थांकडुन दि.०२/०७/२०२५ ते १८/०७/२०२५ या कालावधीत नामांकन मागविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी कार्यालयात सहकार पुरस्कार साठीचे विविध निकष व प्रस्ताव कशाप्रकारे तयार केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन करणेकामी दि.०७/०७/२०२५ रोजी आढावा सभा देखील घेणेत आलेली आहे. तरी रत्नागिरी तालुक्यातील सर्व पात्र सहकारी संस्थांनी सहकार पुरस्कार सन २०२३-२४ साठीचे आपले नामांकन (प्रस्ताव ) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांचे कार्यालयात दि.०२/०७/२०२५ ते १८/०७/२०२५ या कालावधीत, कार्यालयीन वेळेत पाठविण्यात यावेत असे आवाहन श्री. साहेबराव पाटील, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button