गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य (वाणिज्य) डॉ. सीमा कदम मेजर पदाने सन्मानित.

रत्नागिरी : रत्नागिरीतील महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या पहिल्या लेडी एनसीसी ऑफिसर,  वाणिज्य शिक्षणक्रमात एम.कॉम, एम.फील, पीएचडी, नेट, सेट अशा पदव्या प्राप्त असलेल्या रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) उपप्राचार्या (वाणिज्य) डॉ. सौ. सीमा शशिकांत कदम (पूर्वाश्रमीच्या सीमा अनंत कांबळे) यांना रत्नागिरीतील नेव्हल युनिटचे कमांडर के. राजेशकुमार यांच्या हस्ते मेजर (NCC) सन्मानित करण्यात आले.सौ. सीमा यांचा जन्म  लांजा येथील. त्यांचे शालेय शिक्षण लांजातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण  महावीर कॉलेजमधून (कोल्हापूर) पूर्ण केले आहे. शिवाजी विद्यापीठामधून बी.कॉम. त्यानंतर एम.कॉम, एम.फील, पीएचडी, नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. “कोल्हापूर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्या महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास” या विषयावर  त्यांनी पीएचडी केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून हजर झाल्या. गेली २८ वर्षे कॉलेजमध्ये शिकवत असून  शिक्षणाबरोबरच कॉलेज विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एनसीसी (नेव्हल) च्या अधिकारीही आहेत. सन २००६ मध्ये भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून महाराष्ट्र ६- गर्ल्स बटालियन कोल्हापूर अंतर्गत २ – महाराष्ट्र नेव्हल युनिट रत्नागिरीसाठी पहिली लेडी एनसीसी ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली. त्यांनी अनेक शैक्षणिक तसेच अभ्यासेतर, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामधील उपक्रमात आपला सहभाग नोंदविला असून विविध जबाबदाऱ्या निभावत आहेत.डॉ. श्रीमती कदम यांचे कार्य : राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, सेमिनार यामध्ये सहभाग घेवून विविध विषयांवर ३० शोधनिबंध सादर. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या विकास कक्षावर नियुक्ती. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व कै. ज. वा. तथा बाबूराव जोशी ग्रंथालय आदर्श शिक्षक वाचक सन्मान. एसवाय बी.कॉम व टीवाय बी. कॉम या वर्षांसाठी विपणन व्यवस्थापन, खरेदी आणि संग्रहण या विषयावरील पुस्तक लिहिले आहे. मुंबई विद्यापीठअंतर्गत वाणिज्य विषयातील पीएचडी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मान्यता. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन या  विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य.अभ्यासेतर उपक्रम : राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सन १९९८ ते २००४ सालापर्यंत महिला कार्यक्रम अधिकारी. मुंबई विद्यापीठाच्या पॉवर लिफ्टिंग टीमसाठी पटीयाळा पंजाब येथील स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती.  ग्वाल्हेरमध्ये प्रदेश येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तीन महिन्यांचा प्रमोशन कोर्स पूर्ण. आंतरराष्ट्रीय एनसीसी कॅम्पमध्ये व्यवस्थापन कामात सहभाग. राष्ट्रीय स्तरावरील एनसीसी कॅम्पसाठी ट्रेनिंग ऑफिसर म्हणून गोवा व केरळ येथे नियुक्ती. महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजित नौका भ्रमण (मेनू) या राष्ट्रीय स्तरावरील ०५ – कॅम्प मध्ये मुलींच्या संघासह सक्रिय सहभाग. MENU कॅम्प ला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक. आतापर्यंत युनिट, राज्य, राष्ट्रीय अशा विविध आर्मी तसेच नेव्हल च्या ३१ कॅम्प मध्ये सहभागी.सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी : रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पंचायत राज प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती. जिल्हा क्रीडा रत्नागिरी कार्यालय आयोजित युवा महोत्सवात प्रशिक्षक म्हणून कामगिरी. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात सक्रिय सहभाग. आनंदी सोशल फाऊंडेशन या  संस्थेच्या संस्थापक सदस्य. लिंगभाव समानता,  महिला सबलीकरण, लष्करातील स्त्रियांचे योगदान, महिला आणि मानसिक आरोग्य या विषयांवर मार्गदर्शक व्याख्याता म्हणून काम केले आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  “लोकमानस” या कार्यक्रमात युवा पिढी आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर चर्चासत्रांमध्ये सहभागी. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार्‍या वनिता मंडळ या कार्यक्रमात “भारतीय नौसेना संरचना अणि सामाजिक कार्य” या विषयावर व्याख्यान प्रसारित झाले आहे. मानसिक आरोग्यावर कार्य करणारी परिवर्तन संस्था, सातारा यांच्यामार्फत मानस मित्र म्हणून नियुक्ती. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित “विधी साक्षरता कक्षा”साठी समन्वयक म्हणून कार्यरत. ICAI इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट सीए इन्स्टिट्यूटतर्फे मतदान अधिकार अधिकारी म्हणून नियुक्ती.पुरस्कार : सामाजिक भान ठेवून शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असल्याबद्दल बिझनेस एक्स्प्रेस श्री फाऊंडेशन व आम्ही उद्योजिका, सांगली यांच्यातर्फे राज्यस्तरीय “संजिवनी पुरस्कार”, सेफरॉन तर्फे “नवदुर्गा पुरस्कार”, आंतरराष्ट्रीय महिला दिनी माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते चिपळूण येथे सन्मानपत्र, अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय छात्रसेनेच्या ऑफिसर्स प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कमांडंट मेरिट प्रमाणपत्र प्राप्त. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना मुंबईचा ‘7 years दीर्घ सेवा पुरस्कार. शिक्षण क्षेत्रात महिलांविषयी विशेष कार्य केल्याबद्दल साहित्य अकादमी न्यू दिल्ली यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील “वीरांगणा सावित्रीबाई फुले पुरस्कार”. आंतरराष्ट्रीय महिला दिनी “डी.एन.एस बँक” रत्नागिरीतर्फे सन्मानपत्र. डायरेक्टोरेट जनरल ऑफ एनसीसी नवी दिल्ली तर्फे एनसीसीमधील समर्पण, प्रामाणिक आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, “डी जी एनसीसी पदक” २०२० चा पुरस्कार प्राप्त. शैक्षणिक  सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार. देव,घैसास,कीर महाविद्यालयातर्फे आयोजित वाणिज्य परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर कोळवणकर पुरस्कार विजेती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button