
तीन मुली झाल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण तसेच तलाक बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न, सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल
तीन मुली झाल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण तसेच तलाक बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न करत माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. या प्रकरणी पतीसह सासू-सासरे व अन्य एका महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 2016 ते 23 जून 2025 या कालावधीत उद्यमनगर पटवर्धनवाडी फोडकर कॉम्प्लेक्स व कोकणनगर येथे घडली आहे.
सुहेब शाहिद मणेर (वय 35), शाहीद फकू मणेर (58), रफिया शाहिद मणेर (51) आणि सुहेमा ताहिरअली खान (31, सर्व रा. अल अमीर टॉवर उद्यमनगर पटवर्धनवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात नरगीस सुहेब मणेर (33,रा.इकरा इंग्लीश स्कुलजवळ कोकणनगर,रत्नागिरी) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, संशयित आरोपींनी 2016 ते 23 जून 2025 या कालावधीत फिर्यादी विवाहितेला माहेरवरुन पैसे घेेऊन ये, अशी पैशांची मागणी केली. तसेच तीन मुली झाल्या याचा राग मनात धरुन पती सुहेबने तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व वारंवार तलाक तलाक असे बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न केला.