
आ. रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि जय हो प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गणवेश वाटप कार्यक्रम.
*रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शिवाजी हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय युनिफॉर्म वाटप कार्यक्रम करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते आ. रवींद्रजी चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि जय हो प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने युनिफॉर्म वाटप कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांनी प्रार्थनेतून केली. शाळेतील शिक्षक वृंद यांनी संस्थेविषयी माहिती सांगत व भारतीय जनता पार्टी व जय हो प्रतिष्ठान नेहमीच संस्थेला कशा पद्धतीने मदत करते याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी या कार्यक्रमाबद्दल बोलताना सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष पर्यंतचा रवींद्रजी चव्हाण साहेबांचा प्रवासा बाबत बोलत त्यांच्या साध्या राहणीमानाबद्दल आणि उच्च विचारसरणी असलेले नेते असे म्हणत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर भाजपा प्रदेश पदाधिकारी शिल्पाताई मराठे यांनी देखील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दानशूर वृत्तीचे वर्णन करत साहेबांचा आजपर्यंतचा प्रवास व संघटनेबद्दलचे प्रेम त्याबद्दल सांगितले. त्यानंतर जय हो प्रतिष्ठानचे राजू भाटलेकर यांनी आपले मत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टी व जय हो प्रतिष्ठान यांचे सामाजिक काम आ.रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून होत असलेले काम याबद्दल सर्वांना माहिती दिली. त्यानंतर पन्नास शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी मत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टी व जय हो प्रतिष्ठान यांचे नेहमी असलेले सहकार्य आजपर्यंत यांच्या माध्यमातून मिळालेले साहित्य याचा उल्लेख कळल उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, प्रदेश पदाधिकारी सौ.शिल्पाताई मराठे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटलेकर, आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे, गुरुप्रसाद फाटक, मंदार खंडकर,संदीप सुर्वे,सौ. सायली बेर्डे, सौ जोशी, मनोज पाटणकर, सौ. कांचन मुळे, सौ कामना वेग, शंकर शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.