
शहराची अवस्था दाखवण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन -माजी खासदार निलेश राणे
ज्या शहरात आपण राहतो त्याची अवस्था काय झाली आहे हे दाखवण्यासाठी आजचा हा छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उनाड गुरे, कचरा आणि रस्त्यारस्त्यावरच्या खड्ड्यामुळे हे शहर आजारी दिसायला लागले आहे, सत्ताधाऱ्यांनी त्याची वाट लावली आहे, यातुन शहरवासीयांना वस्तुस्थिती समजेल असे मला वाटते असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहराची अवस्था दाखवण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. . यावेळी निलेश राणे म्हणाले की रत्नागिरी शहराचे नाव अभिमानाने घेण्याची आवश्यकता असताना आज ज्यांना विश्वासाने निवडून दिले त्यांनी शहराची काय वाट लावली आहे ते पाहावं आणि नागरिकांना चीड निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे ते म्हणाले.या अनोख्या प्रदर्शनाला अनेक नागरिकांनी भेट दिली. यावेळी शहर विकास आघाडीचे उमेदवार मिलिंद कीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मुरतुझा, निलेश भोसले, हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत, सामाजिक कार्यकर्ते केशव भट, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुहास भोळे, राजन सुर्वे, राजू कीर यासह अनेकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, शहराध्यक्ष संकेत चवंडे, पक्ष प्रवक्ते नित्यानंद दळवी, शोएब खान, मेहताब साखरकर, अविनाश पावसकर, गुरुनाथ चव्हाण, संजय निवळकर, शिवाजी कारेकर, ध्रुवी लाकडे, मानसी चव्हाण, उबेद होडेकर, संदीप पावसकर, अभिलाष कारेकर, राहुल भाटकर, सुभाष पवार, सागर शिवगण, गिरीश जाधव, रमाकांत आयरे, राजू पुनस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com