युवा शक्तीला भरपूर संधी देण्याची ताकद सहकारात नव तंत्रज्ञान आणि सहकार चळवळ याच्या समन्वयातून विकसित भारताकडे गतिमान वाटचाल करण्याचा सहकार हा मूलमंत्र :- दीपक पटवर्धन

आंतरराष्ट्रीय सहकारदिना निमित्ताने सहकारातील संधी या विषयावर विविध हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्याना उद्बोधित करण्याचा उपक्रम adv. दीपक पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय संयुक्त पणे राबवत आहेत. युवा पिढीला सहकार चळवळीची माहिती व्हावी सहकारात असणाऱ्या संधी बाबत जाग्रुकता यावी यासाधी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला अनुलक्षून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सहकार चळवळ ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही कार्यपद्धती नुसार चालणारी व्यवस्था आहे असे सांगत समानुद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन एकत्र आलेला व्यक्ती समूह सहकारी संस्था स्थापन करू शकतो. विविध उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन संस्था नोंदणी करता येते आणि उद्दिष्ट पूर्ती साठी व्यवस्था उभी करून उद्दिष्ट गाठता येते. हे सांगतानाच सहकार चळवळीची वैशिष्ठ्ये पटवर्धन यांनी सहज सुलभ पद्धतीने मांडली.

सभासद संस्थेचे मालक असतात.भाग किती रकमेचे यावर अधिकार अवलंबून नसतात तर सर्व सभासदांना समान अधिकार असतात हे सहकारातील वैशष्ठ्य त्यांनी अधोरेखित केले. नफाखोरी उद्देश नसतो तर साधनांचा सर्वोत्तम विनियोग करत उत्पादकता वाढवण्याचा उद्देश असतो हे सांगताना भांडवलशाही अर्थव्यवस्थे समोर जनसामान्यांनी उभी केलेली ताकद म्हणजे सहकार असे पटवर्धन यांनी ठासून सांगितले. सहकारामध्ये युवा पिढी साठी रोजगार संधी आहेत ,व्यापारी संधी आहेत, नेतृत्व करण्याच्या संधी आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अमितभाई शहा याना सहकारमंत्री केल्यानंतर ग्रामिण भागातील सहकारी संस्थाना नवी दिशा प्राप्त होत आहे ग्रामीण भागातील अर्थकारण गतिमान करण्याच्या मोठ्या संधी सहकार क्षेत्राला प्राप्त आहेत त्या शोधून युवकांनी सहकार चळवळीत सहभागी होऊन नवतंत्रज्ञानाची साथ घेत विकसित भारताच स्वप्नं पूर्ती साठी वेगाने प्रगती साधायला हवी असे पटवर्धन यांनी सांगितले . नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेटे महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साहेब राव पाटील व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. सहकार संधी या विषयावर पटवर्धन हायस्कूल जकादेवी हायस्कूल येथेही दीपक पटवर्धन यांनी विद्यार्थ्याना संबोधित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button