
नाटे पोलीस ठाण्याचे संजय झगडे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती.
नाटे सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागवे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाळकृष्ण झगडे यांना सेवाज्येष्ठता व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते स्टार लावून सन्मानित करण्यात आले.संजय झगडे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल नाटे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, नाटे सरपंच संदीप बांदकर, कात्रादेवी सागवे सरपंच सोनाली ठुकरुल, कात्रादेवी व्यापारी संघटनेचे विद्याधर राणे, प्रकाश पारकर, रमेश लांजेकर, मच्छीमार संघटनेचे नेते अमजद बोरकर, जुनेद मुल्ला यांनी अभिनंदन केले आहे.www.konkantoday.com