
भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघर मध्ये आज आषाढी एकादशीचा (दिंडीचा )कार्यक्रम मोठ्या उत्साह संपन्न झाला.
आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांची वारकरी दिंडी काढण्यात आली. मैदानामध्ये रिंगण करून विठ्ठलाच्या नामघोषात दिंडीचा सर्वांनी आनंद घेतला. काही विद्यार्थ्यांनी संत परंपरा साकारली होती.

विठोबा,-शिवांश भरणकर रुक्मिणी- क्रिष्णा बनप, विठोबा-देवांग पटवर्धन निवृत्ती,-सोहम जोशी, ज्ञानेश्वर ,-आत्रेय तोंडवलकर सोपान, -गौरांग जुवेकर, मुक्ताई-आरोही कांबळे, जनाबाई-स्मरणिका नागले, नामदेव,-सक्षम पेडणेकर, भटजी-प्रियांश मुळे तुकाराम-शौर्य पाटील या सर्व बालकांचे व त्यांच्या पालकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.या कार्यक्रमात माननीय पदाधिकारी शालेय समितीचे अध्यक्ष कदम सर, प्रबंधक हातखंबकर सर, सदस्य चव्हाण सर ,कुष्टे सर ,दळी सर , कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गुरुवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांचे सुपुत्र माननीय श्री .रमेश अच्युतराव पटवर्धन उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला .सर्व मान्यवरांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले. आरती श्लोक गजर अशा भक्तीमय वातावरणात सारेजण तल्लीन झाले होते.या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.धनश्री मुसळे यांनी केले. या कार्यक्रमात सर्व सहकारी शिक्षका व सेविका ताईंचा सक्रिय सहभाग होता .तसेच दिंडी सोहळ्यासाठी पालकांचे उत्तम सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आयुषी विचारे यांनी केले तर सौ सुविधा नार्वेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.