
चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांची विदारक अवस्था
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना टक्कर द्यावी यासाठी एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याचे ढोल बडविले जात आहेत. हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी नासा, इस्त्रो अभ्यास दौरे सुरू करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, नव्या शैक्षणिक वर्षातला पहिला दिवसही वाजत-गाजत साजरा झाला. अशातच चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांची विदारक अवस्था समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवूनही शासनाकडून वेळीच दुरूस्ती न झाल्याने गळक्या, नादुरूस्त आणि धोकादायक शाळांमध्ये सध्या शिक्षणाचे धडे गिरविण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावली आहे.राज्याच्या शिक्षण विभागाकडून खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याच्यादृष्टीने वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. असे असले तरी आजही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती जैसे थे आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा शिक्षणासाठीचा आधार बनून राहिल्या आहेत.www.konkantoday.com