
बारसूतील कातळशिल्पांच्या जतनासाठी निधी वापरा, हायकोर्टच्या खंडपीठाचे आदेश.
कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर केलेल्या चार कोटी ३२ लाखांचा निधी वापरा असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराचे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला. तसेच सरकारी अधिकार्यांनी सूचीत केलेल्या सतरा स्थळांव्यतिरिक्त अन्य स्थळे सुचविण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देत याचिका निकाली काढली.रत्नागिरीतील बारसू (राजापूर) परिसरातील शेतकरी गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांच्यावतीने ऍड. हमजा लकडावाला यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.www.konkantoday.com