
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाबाह्य स्थलांतरित आणि शाळांमध्ये नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांची नोंदणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने १ ते १५ जुलैदरम्यान सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जि.प. प्रशासनाचा राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सांगितले.जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांसाठी सर्वेक्षण म्हणजे शाळेत न जाणार्या किंवा अनियमितपणे शाळेत जाणार्या मुलांसाठी सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाद्वारे अशा मुलांची माहिती गोळा केली जाते व त्यांना शाळेत परत आणण्यासाठी किंवा शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात. एखाद्या गावात काही मुले आर्थिक अडचणींमुळे किंवा कुटुंबाच्या जबाबदार्यांमुळे शाळेत जावू शकत नाहीत, अशा मुलांसाठी सर्वेक्षण करून त्यांना शाळेत येण्यासाठी मदत करता येते त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश किंवा इतर आवश्यक वस्तू पुरवून शिक्षणाच्या प्रवाहात आणता येते. जि.प. शिक्षण विभागस्तरावर हे सर्वेक्षण जिल्ह्यातील गावागावात रेल्वेस्टेशन, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे.www.konkantoday.com