
खेडची कबड्डीपटू समरीन बुरोंडकरला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा बेस्ट महिला खेळाडू पुरस्कार.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा बेस्ट महिला खेळाडू पुरस्कार महाराष्ट्राची महिला कबड्डीपटू आणि खेडची सुकन्या समरीन बुरोंडकर हिला जाहीर झाला आहे. दि १५ जुलै २०२५ रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराबद्दल समरीन बुरोंडकर हिचे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, कार्याध्यक्ष बाबुशेठ तांबे, उपाध्यक्ष सतीश चिकणे, मंगेश मोरे, उमेश सकपाळ, संतोष दामुष्टे, सौ. नेत्रा राजशिर्के, जिल्हा सचिव नितीन बांद्रे, खजिनदार अभिजित सप्रे, भाऊ पवार, पंचंमंडळ प्रमुख सुधीर सावंत, सागर मोरे, सौ. संपदाताई गुजराथी, खेड तालुका कबड्डी एसोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सुभाष आंबडे, सचिव रविंद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू, ऍड. संदेश चिकणे, स्वप्निल सैतवडेकर, दीपक यादव, दिलीप कारेकर, सुजित फागे, सौ. तेजा बैकर, महेश मर्चंडे, अनिकेत स्पोर्टस क्लब प्रशिक्षक, राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे यांनी अभिनंदन केले.www.konkantoday.com