
स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत जन्मशताब्दी सोहळा कृतज्ञता वर्ष व स्व. वसंतराव नाईक जयंती व कृषीदिन उत्साहाने साजरा.
स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्था या संस्थेच्या विद्यमानाने जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या जन्मशताब्दी सोहळा कृतज्ञता वर्ष व १ जुलै २०२५ स्व. वसंतराव नाईक जयंती व कृषीदिन उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले.

या नंतर संस्थेच्या आवारात प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीरंग कद्रेकर उपस्थित सत्कारमूर्ती आणि सर्व संचालक यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला .यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री. दत्ताजी कदम यांनी संस्थेचे संस्थापक व जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.शिवाजीराव सावंत यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे विश्लेषण करून संस्थेची भूमिका विषद केली.नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. श्री. श्रीरंग कद्रेकर यांचे यथोचित स्वागत करून व अध्यक्षांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
यानंतर कृषीदिन व शताब्दीच्या निमित्ताने १) श्री. प्रशांत यादव२) श्री. श्रीधर ठाकूरदेसाई३) श्री. रवींद्र प्रभुदेसाई४) श्री. शाहनवाज शाह ५) श्री. दिपक पटवर्धन ६) श्री. दिलीप नागवेकरयांचा कृषी आणि विविध सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ, रक्तचंदन रोप ,जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. शिवाजीराव सावंत सन्मानपत्र व समाजभूषण पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . ७) श्री. शरद चव्हाण ८) श्री. विजय नारकर ९) श्री. अनिल कदम १०) श्री. विनोद सावंत ११) श्री. महेश सप्रे १२) श्री. भगवान ढेकणे १३) श्री. राजेंद्र पालये १४) श्री. योगेश मोरे १५) श्रीमती अनुराधा राणे १६) श्रीमती तिलोतमा खानविलकर

याच वेळी तालुक्यातील कृषी,फलोद्यान , नर्सरी , पोल्ट्री या उद्योगात व सामाजिक कामात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांनाही शाल, श्रीफळ, रक्तचंदन रोप, सन्मानपत्र व समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .या प्रसंगी डॉ. दिलीप नागवेकर यांनी कृषी विद्यापीठातील स्व. शिवाजीरावांच्या आठवणींना उजाळा दिला . कृषी व फलोद्यान या सबंधित यथोचित मार्गदर्शन केले. संस्थेची वाटचाल कौतुकास्पद असून स्व. शिवाजीरावांच्या विकासाच्या विचारांना मूर्त स्वरूप देणारे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.या प्रसंगी श्री. शाहनवाज शाह यांनी जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, निसर्गातील बदल यावर विस्तृत विवेचन केले व कोकणातील शेतकर्यांनी अग्रक्रमाने या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे असे मत व्यक्त केले . संस्थेचे वृक्षलागवडी संबंधातील कार्य अनुकरणीय व अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले . यांनतर ॲड.सुझित झिमण यांनी सहकारातील संस्थेची यशस्वी वाटचाल खरोखर कौतुकास्पद असल्याचे सांगून अध्यक्ष व संचालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू मा. श्री. श्रीरंग कद्रेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व. शिवाजीरावांचे कोकण कृषी विद्यापीठाशी असलेले सबंध, त्यांची कोकणातील शेतकर्यांच्या विकासाची भूमिका आणि कार्य व त्यांच्या सहवासातील अनेक आठवणींचा उजाळा दिला. या संस्थेत मी यापूर्वी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलोय. पण यावेळी संस्थेच्या कार्यक्षेत्रात झालेला बदल हा खरोखर मनस्वी आनंद देणारा असून हि संस्था भविष्यात नक्की यशस्वी वाटचाल करीत असल्याचे सांगून संस्थेचे अध्यक्ष श्री. विवेकराव सावंत स्व. शिवाजीरावांना अभिप्रेत असणाऱ्या विकासाच्या वाटेवर असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. या नंतर श्री. दत्ताजी कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व आनंद व्यक्त केला.