
गुहागर तालुक्यातील वाकी समतानगरमधील सडलेल्या बीएसएनएल टॉवरचा नागरिकांना धोका.
गुहागर तालुक्यातील वाकी समतानगरमधील बीएसएनएलचा टॉवर सडला आहे. ७० फूट उंचीचा हा टॉवर वार्याने हलत असून तो कोसळल्यास तब्बल चार घरांना धोका पोहचणार आहे. यामुळे मृत्यूची टांगती तलवार असलेल्या या टॉवरची येथील परिसरात दहशत निर्माण झाली असून प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.गतवर्षापासून या मोबाईल टॉवरसंदर्भात आरे-वाकी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने बीएसएनएल कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र वार्यावर पडलेल्या या कार्यालयात कोणी अधिकारीच नसल्याने जाब विचारणार कोणाला अशी अवस्था आहे.www.konkantoday.com