
रत्नदुर्ग येथून पडलेली तरूणी नाशिकमधील असण्याची शक्यता, शोधकार्य सुरूच.
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सनसेट पॉईंटवरून खाली पडलेल्या तरूणीचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिस यंत्रणेकडून तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ती तरूणी नेमकी कोण असावी याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र नाशिकमधून एक तरूणी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाली असून ही तरूणी नाशिक मधील असण्याची शक्यता आहे. ही तरूणी बँक मॅनेजर असलेल्या मित्राला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. २९ रोजी तिने रत्नदुर्ग येथील एका इसमाच्या मोबाईलवरून मित्राला फोन लावला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. दरम्यान या तरूणीच्या मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगण्यात आले.२९ जून रोजी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्याच्या सनसेट पॉईंटवरून एक तरूणी खाली पडल्याने खळबळ उडाली होती. ही तरूणी नेमकी कोण, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. दरम्यान याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही तरूणी नाशिक येथील असून ती मित्राला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. तरूणी रत्नागिरीत एकटीच आली की, तिच्यासोबत अन्य कुणी होते का, याबाबत तपास करण्यात येत आहे. दरम्यान ही तरूणी रत्नदुर्ग किल्ला परिसरात कशी गेली, याचाही अद्याप खुलासा झालेला नाही.www.konkantoday.com