
सर्व्हर डाऊनसारख्या अनेक अडचणी आल्यामुळे अकरावी प्रवेशातील विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप.
इयत्ता ११ वीचा प्रवेश सुकर व्हावा म्हणून शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र सर्व्हर डाऊनसारख्या अनेक अडचणी आल्यामुळे ही प्रक्रिया सुरूवातीपासून अडचणीत सापडली होती. आता संस्थांतर्गत प्रवेश कोटा ठेवण्यात आला असला तरी त्यासाठी पुरेसे प्रवेशोत्सुक विद्यार्थी दिसत नसल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप झाला.सुरूवातीला सर्व्हर डाऊन त्यानंतर अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश असे मुद्दे आक्षेपाचे झाले होते. नॉन क्रिमिलेअर दाखला नसल्यास प्रवेश नाही, असे धोरण असल्याने ते प्रवेश अडचणीत सापडले होते. यावर्षी १० वीचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे शासनाने जाहीर केले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रक्रिया करताना आपली नोंदणी जातीच्या प्रवर्गात केली होती. उन्नत गटात मोडत नसल्याबद्दलचा दाखला आता मागण्यात येत आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.www.konkantoday.com