
रसायनमिश्रित सांडपाणी सोडल्याप्रकरणी अजूनही अहवालाचा पत्ता नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे-हरेकरवाडी येथील नदीत टँकरद्वारे रसायन मिश्रित पाणी सोडल्यावरून प्रारंभी तीन दिवस गाजलेले हे प्रकरण आता कमालीचे थंडावले आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नोटीस बजावली,
मात्र अवघ्या बारा तासातच कारवाईला स्थगिती दिली. व्हीआयपी शेरा मारूनही तीन दिवसात मिळणारा मंडळाच्या प्रयोगशाळेतील पाणी नमुन्याचा अहवाल अद्यापही आलेला नाही. टँकर पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.२१ जून रोजी रात्री ९ वाजता कामथे- हरेकरवाडी येथील एका धाब्याजवळील नाल्याजवळ उभ्या असलेल्या टँकरमधून तीन इंचाच्या पाईपद्वारे रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात होते. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन टँकर अडवले. मात्र तीन टँकर घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी भरलेले टैंकर व चालकही पळून गेले.www.konkantoday.com