
आंबा घाटातील वाहतूक पावसाळ्यात धोकादायक
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. या घाटात मिर्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्ग विभागाने धोकादायक ठिकाणी डोंगराला जाळी मारली आहे. असे असले तरी पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. सर्वाधिक धोका दख्खन ते कळकदरादरम्यान आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावसाळ्यात २४ तास दक्ष राहणे गरजेचे आहेआंबा घाट महाराष्ट्रातील एक सुंदर घाट आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत असून येथील निसर्गरम्य दृश्य आणि थंड हवामान पर्यटकांना खूप आकर्षित करते.
याच घाटातून मिर्या नागपूर महामार्ग जात असून काम देखील प्रगतीपथावर आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने घाटाचे निसर्ग सौंदर्य हरवले आहे.महामार्गाच्या कामासाठी डोंगर कटाई करण्यात येत आहे. काळा कातळ फोडण्यासाठी सुरूंगाबरोबर अत्याधुनिक यंत्रसामुग्री सज्ज आहे. दख्खन ते कळकदरादरम्यान काम जोमाने सुरू आहे. पावसामुळे डोंगरातील पाणी झिरपून बाहेर येत असल्याचे चित्र आहे. परिणामी दरडी खाली येत आहेत. आठ दिवसांपूर्वी दख्खन येथे भलीमोठी दरड कोसळली. ही दरड बाजूला करताना रवी इन्फ्रा कंपनीच्या कर्मचार्यांची दमछाक झाली. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य देखील आहे. पावसाळ्यात सावधपणे प्रवास करावा लागणार आहे. वाहन चालकांनी शक्यतोwww.konkantoday.com