
कोकणातलं मिनी महाबळेश्वर माचाळ पर्यटकांचे आकर्षण.
कोकणातलं मिनी महाबळेश्वर अशी ओळख मिळालेलं माचाळ गाव सध्या पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, धुक्याची चादर, गारेगार वातावरण आणि डोंगरावरून कोसळणार्या धबधब्यामुळे रोज शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करू लागले आहेत.
मात्र पर्यटकांच्या धुडगूसामुळे येथील पर्यटनाला गालबोट लागत आहे.तालुक्यातील माचाळ हे गाव पर्यटकांसाठी तसेच ट्रेकसाठी अनोखा अनुभव देणारे ठरत आहे. गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर रस्ता पोहोचल्याने माचाळ हिल स्टेशन म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. येथे येणारे पर्यटक मद्य पिऊन धुडगुस घालतात, मद्याच्या बाटल्या फोडून वाटेत टाकतात. खाण्याचे पदार्थ रस्त्यात फेकतात. तसेच मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांकडून आपल्या कुटुंबियांसह येणार्या पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com