
कामथे नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी काय कारवाई केलीत? उबाठाने विचारला संबंधितांना जाब.
कामथे हरेकरवाडी येथील नदीत केमिकलचें पाणी सोडल्याप्रकरणी गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनी वादाच्या भोवर्यात सापडली आहे. याप्रकरणात सुरूवातीपासूनच आक्रमक राहिलेल्या शिवसेना उंबाठा पक्षाने संबंधितांवर कारवाईसाठी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. सोमवारी काही पदाधिकार्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडक दिली. कंपनीला उत्पादन सुरू ठेवण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली असली तरी आतापर्यंत या प्रकरणात काय कारवाई केलीत, असा जाब विचारत अधिकार्यांना धारेवर धरले.कामथे हरेकरवाडी येथील नदीत केमिकलचे पाणी सोडण्यात आले होते.
पोलिसांनी दोन टँकर पकडल्यानंतर ते पाणी साफिस्ट कंपनीचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शिवसेना उबाठा पक्ष, मनसे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूण पोलीस स्थानकावर धडक देत या प्रकरणाचा सखोल तपास करून कारवाईची मागणी केली होती. पोलीस आणि एमपीसीबीच्या अधिकार्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकार्यांना पाठवला होता. या अहवालानंतर एमपीसीबीच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे कंपनीला उत्पादन थांबण्याचे आदेश श्री. घरत यांनी दिले होते. मात्र कंपनीने काही दिवसांची मुदत मागितल्याने उत्पादन सुरू ठेवण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाणी नमुन्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात संबंधित टँकर मालक व चालकांवरही अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत.www.konkantoday.com