
डेरवण येथील वालावलकर या रुग्णालयात मेंदू संबंधित दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.
रुग्णालयाने मेंदूशी संबंधित अत्यंत दुमिर्ळ आणि गुंतागुंतीच्या आजारावर यश मिळवत वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक माेलाचा टप्पा गाठला आहे. ’स्पाॅन्टेनियस सेरेब्राेस्पायनल फफ्लूइड रायनाेरिया’ या मेंदूतील पाणी नाकातून गळण्याच्या आजारावर येथे यशस्वी एंडाेस्काेपिक शस्त्रक्रिया करण्यात आली.44 वर्षीय महिलेला नाकातून सातत्याने पाणी गळण्याचा त्रास हाेत हाेता.
सुरुवातीला सर्दी समजून दुर्लक्षित झालेल्या या लक्षणांमागे मेंदूतील पाण्याची गळती असल्याचे निदान एछढ विभागाच्या डाॅ. राजीव केणी यांनी केले. तत्काळ उपचार सुरू करत रुग्णाला मेंदू शल्यचिकित्सक डाॅ. मृदुल भाटजीवाले यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी सीटी सिस्टर्नाेग्राम तपासणीद्वारे गळतीचे अचूक स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, मेंदू उघडण्याऐवजी नाकातून दुर्बिणीद्वारे (एंडाेस्काेपिक) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. एछढ, मेंदू शस्त्रक्रिया आणि भूलतज्ञांच्या संयुक्त टीमने अत्यंत अचूकतेने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्ण केली.www.konkantoday.com