
कुंभार्ली घाटातून मार्ग बंद असल्याने चिपळूण आगाराचे 52 लाखांचे नुकसान.
चिपळूण-कराड महामार्गावरील कुंभार्ली घाटात अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असून त्यामुळे एसटीची वाहतूक मागील 13 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे चिपळूण आगाराचे 13 दिवसांत तब्बल 52 लाखांचे नुकसान झाले आहे. या मार्गावरील वाहतूक कधी सुरू हाेईल हे आता निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने 16 जूनला पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे 17जूनपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा सर्वाधिक फटका एसटीला बसला आहे. चिपळूण आगारातून या मार्गावर सकाळी 6.30 ते रात्री 11.50 पर्यंत तब्बल 34 ेèया राज्याच्या वेगवेगळ्या भागात साेडल्या जातात. काही गाड्या कर्नाटक राज्यातील बेळगावला साेडल्या जातात. सर्वाधिक गाड्या पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर, बीड, बारामती या भागात साेडल्या जातात. चिपळूण-कराड मार्ग अजूनही रेल्वेने जाेडलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतुकीला चांगले भारमान मिळते. सुमारे 6 हजार किमी एसटीची दिवसा वाहतूक हाेते.www.konkantoday.com